ताज्या बातम्या
Pandurang Balkawade : 'किल्ल्यांचं जतन करण्याची जबाबदारी सर्वांची'; इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचं प्रतिपादन
ज्येष्ठ इतिहास संशोधक, दुर्ग अभ्यासक, शिव चरित्र व्याख्याते पांडुरंग बलकवडे यांच्याशी लोकशाही मराठी चॅनेलच्या पुणे प्रतिनिधींनी संवाद साधला.
महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूमधील एक अशा १२ गडकिल्ल्यांचा युनेस्कोनं जागतिक वारसा यादीत स्थान दिल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी आनंद साजरा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या या किल्ल्यांना जागतिक पातळीवर मिळालेला मान ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. या निमित्ताने ज्येष्ठ इतिहास संशोधक, दुर्ग अभ्यासक, शिव चरित्र व्याख्याते पांडुरंग बलकवडे यांच्याशी लोकशाही मराठी चॅनेलच्या पुणे प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी किल्ल्यांचं जतन करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचं मत बलकवडे यांनी व्यक्त केलं.