सांगलीत विजय मिळवल्यानंतर अपक्ष उमेदवार विशाल पाटील म्हणाले...

सांगलीत विजय मिळवल्यानंतर अपक्ष उमेदवार विशाल पाटील म्हणाले...

सांगलीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांचा विजय झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

सांगलीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांचा विजय झाला आहे. तर ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि भाजपाचे संजयकाका पाटील यांचा पराभव झाला. याच पार्श्वभूमीवर आता विशाल पाटील यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

विशाल पाटील म्हणाले की, सच्च्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या संधीचे सोने करेन. आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आणि सर्वसमावेशक काँग्रेस विचार टिकवण्यासाठी आपण लढतो आहोत. आज झालेला विजय आपण पहिली लढाई जिंकलो याचे प्रतीक असून अजून पुढील अनेक लढाया आपणास अशाच पद्धतीने विरोधकांना चारीमुंड्या चीत करून जिंकायच्या आहेत. आपल्या या अतूट नात्याच्या साक्षीने, तुम्हा सगळ्यांना सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की विकासकार्याचे ध्येय घेऊन आज एका नव्या दिशेने प्रवास सुरु करतो आहे. ह्या प्रवासात तुम्हा सगळ्यांची, माझ्या मायबाप जनतेची अशीच साथ पुढे मिळेल हा विश्वास आहे.

निवडणूका जाहीर झाल्या तेव्हापासून सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले. जिल्ह्यातील काँग्रेस मरगळलेली नाही तर पूर्णक्षमतेने रिचार्ज झालेली आहे हे आपण आजच्या निकालातुन दाखवून दिलं. वंचित बहुजन आघाडीचे मा. प्रकाशजी आंबेडकर, माजी मंत्री मा. अजितराव घोरपडे (सरकार), काँग्रेसचे नेते माजी मंत्री आ. विश्वजित कदमसाहेब, माजी आ. विलासराव जगताप साहेब, आ. विक्रमसिंहदादा सावंत, श्रीमती जयश्रीवहिनी मदनभाऊ पाटील, मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांचेसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवरांनी सर्वोतोपरी केलेले सहकार्य विसरणे अशक्य आहे. विशेषतः कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमांबद्दल, मी सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे !

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com