BMC Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाची रणनिती; 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदाऱ्या
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला आहे. मुंबईतील प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर, मातोश्रीवर झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पुढील रणनिती आखण्यात आली असून, मुंबईतील विविध विभागांवर 12 उपनेत्यांवर विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. या बैठकीत उपनेत्यांना विधानसभा निहाय जबाबदाऱ्या देत, प्रत्यक्ष मतदारसंघांमध्ये जाऊन आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच स्थानिक शाखाप्रमुख आणि निरीक्षकांकडून माहिती गोळा करून केंद्रस्तरावर रिपोर्टिंग करण्याचाही आदेश आहे.
जबाबदारी मिळालेल्या उपनेत्यांची यादी:
उपनेते जबाबदारी असलेले विभाग
अमोल कीर्तीकर ,दहिसर, बोरिवली, मागाठाणे
उद्धव कदम, चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम
विलास पोतणीस ,दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व
विलासराव नेरुरकर, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, वर्सोवा
रवींद्र मिरलेकर, विलेपारले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम
गुरुनाथ खोत, चांदिवली, कलिना, कुर्ला
नितीन नांदगावकर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड
अरुण दुधवडकर, धारावी, माहीम, वडाळा
अशोक धात्रक, वरळी, दादर, शिवडी
सचिन अहीर, मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी
या जबाबदाऱ्यांमुळे उपनेत्यांना स्थानिक गटांचे समन्वय, कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन, वॉर्डनिहाय नियोजन व प्रचाराची दिशा ठरवण्याचे कार्य देखील करावे लागणार आहे.
काय म्हणाले ठाकरे गटातील नेते?
याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या तयारीसाठी सुरुवातीपासूनच बैठका घेतल्या जात आहेत. "लढा आपल्या मुंबईचा" या अभियानाअंतर्गत प्रत्येक वॉर्डमध्ये जनसंपर्क वाढवण्याचा उद्देश असून, यासाठी उपनेत्यांना स्पष्ट जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेसह इतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्यभरात ठाकरे गटाकडून संघटनात्मक बांधणीला वेग देण्यात आला आहे. मात्र विशेष लक्ष मुंबई महानगरपालिकेवरच केंद्रित आहे, कारण ही निवडणूक ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे.