ताज्या बातम्या
Air India plane crash : चमत्कार! विमानातील सर्व सामान जळून खाक; मात्र अखंड श्रीमद्भगवद्गीता लागली हाती
अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला गुरुवार भीषण अपघात झाला. अहमदाबाद एअरपोर्टवरून उड्डाण घेतलेलं विमान अवघ्या 40 सेकंदाच्या अंतरावर एक हॉस्टेलवर पडलं.
अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला गुरुवार भीषण अपघात झाला. अहमदाबाद एअरपोर्टवरून उड्डाण घेतलेलं विमान अवघ्या 40 सेकंदाच्या अंतरावर एक हॉस्टेलवर पडलं. या भीषण अपघतात विमानातील प्रवाशांसह हॉस्टेलमधील काही डॉक्टरांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अचानकपणे क्रॅश झालेल्या या विमानानं पेट घेतला. या आगीच्या आगडोंबमध्ये सर्वकाही जळून खाक झालं. मात्र प्रवासातील सामानांमध्ये श्रीमद्भगवद्गीतेची एक आवृत्ती सापडली असून ती जशीच्या तशी असल्याचे दिसून आले आहे. इतकी भयंकर आग लागूनही या श्रीमद्भगवद्गीतेचं पानंन् पान आहे तसंच राहिल्याचं पाहायला मिळत आहे. हे एका चमत्कारापेक्षा कमी नाही, अशी चर्चा सर्वत्र होत आहे.