अहमदनगरमध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक; श्रीरामपूरातील हरेगाव फाटा येथे शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन

अहमदनगरमध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक; श्रीरामपूरातील हरेगाव फाटा येथे शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन

अहमदनगरमध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

गोविंद साळुंखे, शिर्डी

अहमदनगरमध्ये दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. श्रीरामपूरातील हरेगाव फाटा येथे शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. नेवासा-संगमनेर रस्ता अडवत त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं आहे.

दुधाला प्रतीलिटर 40 रुपये भाव देण्याची मागणी, दुधात भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

तसेच संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे. दुधात सुरू असलेली भेसळ कायमस्वरूपी बंद करून कठोर कायदे करावे अशा विविध मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com