Pune Festival: पुणे फेस्टिवलमध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक अजित पवार आणि सुरेश कलमाडी एकाच मंचावर
आज दूपारी चार वाजता पुणे फेस्टिवल सुरु झालं होत. यामध्ये गणेशोत्सव, कला आणि क्रिडा यांचे समावेश असणारे हे फेस्टिवल होत. यामध्ये अनेक खेळ ठेवण्यात आलेले होते ज्यात बॉक्सिंग, डर्ट ट्रॅक रेसिंग, गोल्फ स्पर्धा आणि अशा अनेक स्पर्धा या फेस्टिवल दरम्यान ठेवण्यात आलेल्या होत्या. तसेच यात अनेक कवींना आपली कवीता, लेख तसेच मुशायरे अशा गोष्टी सादर करण्याची संधी दिली गेली होती. तर यात "जन देवाचिया गाव" या नावाच्या नाटकाचा देखील समावेश होता.
हा फेस्टिवल 8 सप्टेंबर ते 17 सप्टेंबरपर्यंत सुरु आहे. त्यादरम्यान या फेस्टिवलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. तर यादरम्यान खासदार छत्रपती शाहू महाराज यांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. पुणे फेस्टिवल निमित्त एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले अजित पवार आणि सुरेश कलमाडी आज एकाच मंचावर पाहायला मिळाले तसेच हे दोघेही एकमेकांच्या आजूबाजूला बसलेले देखील पाहायला मिळाले. तर या भेटीगाठी दरम्यान बाहेर चर्चांना उधाण येताना दिसत आहे.