'मी शरद पवारांना सोडलेलं नाही तर...' अजित पवारांचं बारामतीत मोठं वक्तव्य
बारामतीतील माळेगावमध्ये अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी शरद पवारांना सोडलेलं नाही, सगळ्याच आमदारांची इच्छा सरकारमध्ये जाण्याची होती. निधी मिळण्यासाठी अडचण होत असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याच म्हणाले. अजित पवारांच्या या विधानमुळे अनेक चर्चाना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित पवार आज गावभेट दौरा करीत आहेत. बारामतीमधील ढाकाळे इथं भेट देऊन गावभेट दौऱ्याला सुरुवात झालीय. बारामतीमधील ढाकाळे, माळेगाव खुर्द आणि कऱ्हावागज या गावांचा अजित पवार गावभेट दौरा करणार आहेत. गावभेट दौऱ्या दरम्यान अजित पवार हे नागरिकांशी संवाद साधून मार्गदर्शन करत आहेत.
अजित पवार म्हणाले की, माळेगांव मधील काही पुढारी चुकीचं काम करतायत मी तुम्हाला सांगतो तुम्हाला तसं करायच असेल तर उघड करा. पूर्वी आमदार झालो त्यावेळी याठिकाणी काय होत कुसलं यायची आता काय परिस्थिती आहे त्यामुळे तुम्ही विचार करून मला साथ द्या. साहेबाचा आदर राखून ताईंना साथ दिली.
एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाचा माळेगांवच्या सभेला महिला आल्या आहेत. तुम्हाला पैसे देऊ आणलं का? कारण दोन दिवसापूर्वी पैसे देऊन सभेला आणलं गेलं. असं कधीच आजपर्यंत झालं नव्हतं मात्र ही पद्धत अतिशय चुकीची आहे.
मी उद्या सभा घेणार आहे. ते पण सभा घेणार आहेत ते त्यांचा विचार मांडतील मी माझा विचार मांडणार आहे पुढच्या पिढीसाठी कुणाला साथ द्यायची हे ठरवा.
मी न मागता सगळं करतोय याची तुम्हाला किंमत कळत नाही मी कॅनॉलचे पाणी आणले नसती तर ऊसाची पाचट झाली असती. विनंती करणे माझं काम आहे. मतदार म्हणून निर्णय तुमचा आहे. पवार साहेबांनी रिटायर झाले मग बारामतीकडे कोण लक्ष देऊ शकतो. लोकसभेला साहेबांला साथ दिली.
साहेबांनी सांगितलं तीस वर्ष साहेब तीस वर्ष अजितला संधी दिली अरे बारामतीत पवारांशिवाय दुसरं कोण नाही का? आयुष्यभर पवार राहणार का बाकीच्यांनी काय गोट्या खेळायच्या का?( अजित पवार यांच्या पवार उमेदवारावरून मोठं वक्तव्य )