बातम्या
अजित पवारांचं लोकसभा निवडणुकीबाबत मोठं विधान; म्हणाले, मला एक बातमी अशीही कळली आहे की...
पुण्याच्या टिंबर मार्केटला राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भेट दिली.
पुण्याच्या टिंबर मार्केटला राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांचे हे विधान चर्चेचा विषय बनलं आहे.
अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पुण्यातील कसबा पेठ लोकसभा मतदारसंघात गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. मला एक बातमी अशीही कळली आहे. मला वाटत होतं की लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिलंय. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही. अशी माझी आतल्या गोटातली माहिती आहे. असे अजित पवार म्हणाले.