Ajit Pawar
Ajit Pawar

...म्हणून १९९९ ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनेतला संबोधीत करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
Published by :

Ajit Pawar Indapur Speech : काही लोक म्हणतात, या वयात दादांनी साहेबांना सोडायला नको होतं, मित्रांनो मी साहेबांना कधीही सोडलं नाही. मी १९८७ ला राजकारणाची सुरुवात केली. तरुणांना सोबत घेऊन खरेदी-विक्री संघात बसायला लागलो. तेव्हापासून २०२३ पर्यंत पवार साहेब म्हणतील ती पूर्वदिशा. परंतु, आम्ही लहान असताना मला आजी-आजोबांनी सांगितलं होतं, आपलं सर्व कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं होतं. स्वर्गीय वसंतदादा पवार आमचे थोरले काका निवडणुकीला उभे होते. त्यावेळी पवार साहेब कॉलेजमध्ये विद्यार्थी होते. साहेबांनी त्या दिवशी त्यांना विरोध केला. पवारांचं आख्खं कुटुंब आमच्या दादांसोबत होतं. पण पवार साहेबांनी त्यावेळी विरोधात काम केलं. त्यानंतर राजकीय समीकरणे बदलली, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनेतला संबोधीत करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

अजित पवारांनी सांगितला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेचा घटनाक्रम

अजित पवार म्हणाले, शरद पवार साहेब १९६७ ला उभे राहिले. परंतु, त्या वर्षी चव्हाण साहेबांनी पवार साहेबांना संधी दिली. इथल्या प्रत्येकाला कुणीतरी संधी दिली. हर्षवर्धन पाटलांना घोलप साहेबांनी संधी दिली. साहेबांनी मलाही संधी दिली. १९७२ पवार साहेब पुन्हा राज्यमंत्री झाले. १९७५ ला मंत्री झाले. सरकारचं कारभार सुरु होतं, पण १९७८ ला वसंतदाद पाटील यांचं सरकार पाडलं आणि जनता पक्षाला सोबत घेऊन सरकार बनवलं. त्यावेळी पवार साहेबांनी चव्हाण साहेबांचं ऐकलं नाही. ज्यांनी संधी दिली, त्यांचच ऐकलं नाही. १९८० ला दादांचच मंत्रिमंडळ आलं. त्यानंतर अंतुले साहेबांचं सरकार आलं. त्यानंतर १९८५ ला पराभव झाला. त्यानंतर १८८६ डिसेंबर मध्ये आम्हाला सांगण्यात आलं, आता आपण समाजवादी काँग्रेस आयमध्ये विलीन करायची.

औरंगाबादला (संभाजीनगर) तो कार्यक्रम झाला होता. त्यानंतर १९८८ ला जुलैमध्ये मुख्यमंत्री झाले. १९९० ला निवडणुका झाल्या तेव्हाही मुख्यमंत्री झाले. १९९१ ला तुम्ही मला खासदार बनवलं. मला पी व्ही नरसिंह राव यांनी सांगितलं, विश्वासदर्शक ठराव झाल्यावर राजीनामा द्यायचा. राजीनामा देऊन टाकला. पुन्हा मी आमदार म्हणून निवडून आलो. ते खादसार म्हणून निवडून आले. त्यानंतरच्या काळात ते अनेकदा कृषीमंत्री होते. त्यानंतरच्या काळाच बॉम्बस्फोट झाला. १९९५ ला पुन्हा सरकार गेलं. छगन भुजबळ यांना विरोधी पक्षनेता केला आणि साहेब दिल्लीला गेले. सर्व प्रचाराची यंत्रण आपण बघत होतो. कुठेही अडचण येऊ देत नव्हतो.

कारखाने, सर्व जिल्हा परिषद, जिल्हा बँक, सर्व संस्था साहेबांच्या बरोबर कशा राहतील, यासाठी प्रयत्न केला. पण त्यानंतरच्या काळाता काही गोष्टी बदलल्या, १९९९ ला असा मुद्दा काढला, सोनिया गांधी विदेशी आहे. आपल्या देशात जन्माला आलेली व्यक्ती देशाचा पंतप्रधान नसेल, तर कसं चालेल, हा प्रश्न उपस्थित झाला. पवार साहेबांनी निर्णय घेतला आणि १० जून १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना झाली. ही निवडणूक गावकी, भावकीची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. तुम्हाला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पाहिजेत की राहुल गांधी? हा निर्णय जनतेनं घ्यायचा आहे. वेळ कमी असल्याने नाईलाजाने आम्हाला दुपारी सभा घ्यावी लागत आहे. तुमची पण अडचण होते, याची आम्हाला जाणीव आहे.

परंतु, वेळेच्या पुढे आमचीही काही चालत नाही. बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे, अजित पवारांनी हा निर्णय का घेतला? आपण सर्व एकाच कुटुंबातील आहोत. आपण सर्वांनीा माझी कारकीर्द बघितली आहे. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की, मी कधी राजकारणात येईल, एक घाव दोन तुकडे, असा माझा स्वभाव. मला खूप जण बोलले, तुम्ही काय राजकारणात येणार नाही. परंतु, मला लोकांनी प्रेम आणि पाठिंबा दिला. हर्षवर्धन पाटील आणि मी आज विकासासाठी एकत्र आलो आहे. आज आम्ही देशाचा सर्वांगिण विकासा व्हावा, देश जगातील तिसरी अर्थव्यवस्था व्हावी, देश महासत्ता बनावी. देशातील सर्व जातीचा धर्माचा माणूस गुणागोविंद्याने नांदावा, त्याला मदत व्हावी, हाच आमचा प्रयत्न आहे, असंही अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com