'मलाही मुख्यमंत्री व्हावसं वाटतं' अजित पवारांनी व्यक्त केली खंत
महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप झाला. २ जुलै २०२३ या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. अशात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बैठका मुंबईत पार पडल्या. पहिली बैठक अजित पवार गटाची होती तर दुसरी शरद पवार गटाची. या बैठकीत मला मनापासून वाटते मी राज्याचा प्रमुख व्हावं. माझ्या मनामध्ये काही गोष्टी आहेत. त्या राबवायच्या म्हटले तर प्रमुखपद लागते, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, 2024 मध्येही मोदींचं सरकार येणार, असे आमच्या वरिष्ठांनी सांगितले. मी खोटं नाही बोलणार... खोटं बोलून मला काय मिळवायचे आहे. तुम्ही खूप काही प्रेम दिले.. चार की पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो... माझं तर रेकॉर्ड झाले. पण तिथेच गाडी थांबते, पुढे काही जात नाही. मला चार वेळा उपमुख्यमंत्री केले आता पाचव्यांदा उपमुख्यमंत्री केले, मला पण मोठ्या पदाची अपेक्षा आहे, असे अजित पवार म्हणाले.
मी अतिशय स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आम्ही कुठेही कामामध्ये कमी आहोत का? आम्ही कार्यकर्त्यांपर्यंत पोहचण्यासाठी कामी आहोत का? असा सवाल उपस्थित करत अनेक वर्ष मोठ्या पदापासून दूर ठेवल्याची खंत अजित पवारांनी व्यक्त केली.
दरम्यान, गेली अनेक वर्षे तुम्ही राजकारण करत आहे. आता 80 वर्षाचे झाले. नवीन नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे. आता तुमचे वय झाले आहेत. तुम्ही कधी थांबणार आहे की नाही? असा सवालही अजित पवारांनी शरद पवारांना केला आहे.