ताज्या बातम्या
बारामतीत झळकले अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री बॅनर
राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सुरु आहे.
विकास कोकरे, बारामती
राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सुरु आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा बारामती आणि फलटणमध्ये येणार आहे. या यात्रेला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, खासदार सुनेत्रा पवार , सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर बारामतीत अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री बॅनर झळकले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा बारामती दाखल होत आहे.
या जनसन्मान यात्रेच्या पार्श्वभूमीवर भावी मुख्यमंत्री हे बॅनर झळकले आहे. 'यंदा मुख्यमंत्री दादाच' असे हा बॅनरवर लिहिण्यात आले आहे. बारामतीतील बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.