Ajit Pawar On Ravindra Dhangekar : "आपण आता काँग्रेसमध्ये नाही हे धंगेकरांच्या लक्षात येईना" अजित पवारांकडून धंगेकरांना समज

Ajit Pawar On Ravindra Dhangekar : "आपण आता काँग्रेसमध्ये नाही हे धंगेकरांच्या लक्षात येईना" अजित पवारांकडून धंगेकरांना समज

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये अंतर्गत कुरघोडी पाहायला मिळत आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदेंच्या गटात काही नेत्यांमध्ये मतभेद पाहायला मिळत आहे. याचपार्श्वभूमिवर आज पुणे दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे
Published by :
Prachi Nate
Published on

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये अंतर्गत कुरघोडी पाहायला मिळत आहेत. भाजप आणि शिवसेना शिंदेंच्या गटात काही नेत्यांमध्ये मतभेद पाहायला मिळत आहे. अलिकडेच धंगेकरांनी घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावरुन भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. यावरुन भाजप नेत्यांमध्ये नाराजी पसरलेली पाहायला मिळाली.

याचपार्श्वभूमिवर आज पुणे दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याच पार्श्वभूमीवर यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, "आज जनसंवाद कार्यक्रम निमित्तने लोकांना भेटणार आहे. वारजे भागात काही प्रश्न होते, त्यामुळे मी सकाळी सुरुवातीला वारजेपासून केली. न्यू अहिरे, शिवणे, धायरी dp रोड पाहणी केली. काही शेतकऱ्याचे प्रश्न होते, मोजणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला. कात्रज चौकाची पाहणी केली. आज सकाळीपासून सर्व अधिकारी चर्चेतून मार्गी लावली आहेत. ब्रिज सर्व्हिस रोड करायचा आहे. शिवणेमध्ये नवीन ब्रिज बांधायचा आहे".

"रवींद्रजींच्या लक्षात येईना आपण आता काँग्रेसमध्ये नाहीये, आपण शिवसेनेत आहोत धनुष्यबाणसोबत आहोत. एकनाथराव शिंदे साहेब सांगतील आपलं हे माहितीच सरकार आहे. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना भाजपने राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. आमच्यासोबत काम करत असताना काही गोष्टी कार्यकर्त्यांनी पाळले पाहिजे."

तसेच अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी केवळ हिंदू लोकांच्याच दुकानातून खरेदी करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे पुन्हा जातीवाद निर्माण झाला आहे. संग्राम जगताप यांच्या वारंवार वादग्रस्त विधानावरून अजित पवार यांनी कठोर भूमिका घेतली आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, "हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. अतिशय चुकीचं विधान केल आहे. आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत. आता काही लोकांना आपल्यावर जबाबदार वाढली वडिलांच छत्र राहील नाही. त्यावेळेस आपण जबाबदारीने वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. त्याला याआधी देखील अनेकदा समजवलं आहे पण तरी देखीस तो सुधारत नाही. त्याची भूमिका पक्षाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत." सतत समज देऊन देखील त्यांच्यात काही सुधारणा होत नसल्याचे अजित पवारांनी मोठी भूमिका घेतली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com