Ajit Pawar : "इजा बिजा झाला, तिजाची वेळ येऊ देऊ नका" अजित पवारांच्या कुणाला सूचना
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेला मराठी भाषेचा मुद्दा, कृषीमंत्र्यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ, हनी ट्रॅप, दौंड गोळीबार, कंत्राटदार आत्महत्या या सर्व मुद्द्यांवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याच्या व्हिडिओवर अजित पवार म्हणाले की, "मला मिळालेल्या माहितीनुसार तो सभागृहाच्या आत घडलेला प्रकार आहे. मला कृषिमंत्र्यांच्याशी समोरा समोर बोलायचं आहे. सोमवारी ते भेटल्यावर आमच्यात बोलण होईल. ते भिकारी म्हणाले याबाबत देखील मी त्यांच्याशी बोलणार आहे. त्यांच्याबद्दल जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही एकत्रित घेऊ".
पुढे हनी ट्रॅपबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, "दम द्यायचे सोडून द्या काय सिड्या पेन ड्राईव्ह आहेत ते एकदाचे दाखवा तरी काय ते सत्य लोकांपुढे येऊ द्या. त्यात चार मंत्री आयएस ॲाफिसर आहे. मंत्री म्हणतात की सगळे आमच्याकडे, पोलिस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने तपास करेल".