Ajit Pawar On Sharad Pawar : "प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार"; पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर प्रतिक्रिया
गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरुन ठेवला आहे. अशातच आता पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात शरद पवारांनी एक वक्तव्य केलं. ज्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांना पुर्णविराम लागण्याची शक्यता आहे.
अजित पवारांना सोबत घेण्याबाबत शरद पवारांनी एक मोठ वक्तव्य केल. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, "प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे" एवढ म्हणत अजित पवारांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
यादरम्यान शरद पवार म्हणाले होते की, "त्याचसोबत जे भाजपसोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही. तसेच गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकर विचारांना सोबत घेऊ आणि संधीसाधूपणा करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही" असं देखील शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता शरद पवार अजित पवारांसोबत जाणार नाही अशी चर्चा सुरु झाली आहे.