नाना काटेंच्या बंडखोरीनंतर अजित पवार भेटीला, म्हणाले...
चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीतून बंडखोरी करणाऱ्या नाना काटे यांची आज अजित पवार यांनी भेट घेतली. यांच्यात काही वेळ चर्चा झाली. या चर्चेत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक देखील उपस्थित होते. नाना काटे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. बंडखोरी थांबवण्यासाठी अजित पवारांनी नाना काटे यांची भेट घेतली आहे.
नाना काटे यांच्या भेटीनंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया
चिंचवडची जागा महायुतीत भाजपला गेली आहे. नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. म्हणून भेटायला आलो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. मी सांगेल तीच निर्णय घ्यावा लागेल अस मी त्यांना सांगितलं आहे.
मावळमध्ये ही तिढा निर्माण झालाय. याबद्दल काल चर्चा झाली आहे. अशा ठिकाणी सामंजस्य भूमिका घ्यावी लागेल. उमेदवाराने ऐकलं नाही तर काही कठोर निर्णय घेणार. यातून मार्ग काढणार असल्याच ते म्हणाले.
मी महायुतीचा जबाबदार व्यक्ती आहे. प्रत्येकाच्या बद्दल बोलणार नाही. 20 तारखेपर्यंत एकोपा ठेवायचा आहे. यावर मी उत्तर देणार नाही. आम्हाला महायुतीचा सरकार आणायचं आहे अस ते म्हणाले.
दरम्यान, नाना काटे आधी महायुती मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, परंतु भाजपच्या शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी शरद पवार गटातून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता, तिथे देखील अपयश आल्याने काटे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा ठरवलं, उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, हीच महायुतीमधील बंडखोरी रोखण्यासाठी अजित पवारांनी नाना काटे यांची भेट घेतली आहे.