Nitin Pawar, Ajit Pawar
Nitin Pawar, Ajit PawarTeam Lokshahi

'संध्याकाळी फोन आला...' नितीन पवारांनी सांगितला घटनाक्रम

राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत.
Published by :
shweta walge
Published on

राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. तर भुजबळ, वळसे-पाटील, मुंडे यांच्यासह इतरांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र हा भूकंप कसा घडला याबाबत चर्चा सुरु असताना अजित पवार समर्थक आमदार नितीन पवार यांनी सांगितले आहे.

आमदार नितीन पवार यांनी सांगितले की, परवा संध्याकाळी आम्हाला फोन आला, मुंबईत बोलावण्यात आले. सकाळी घरगुती कार्यक्रमामुळे मला जाता आले नाही. संध्याकाळी मी अजित पवारांची भेट घेतली. आमदारांच्या ज्या पत्रावर सह्या घेतल्या त्या सगळ्या वाचून दाखवून सह्या घेतल्या. कुणालाही न लपवता सह्या घेतल्या असं काही वाटलं नाही. आम्ही सर्व राष्ट्रवादीसोबत आहोत. मतदारसंघातील विकास करायचा असेल तर अजित पवारच करू शकतात. त्यामुळे मी अजितदादांसोबत आहे असं त्यांनी सांगितले. यात कुठलीही तांत्रिक अडचण येईल असं वाटत नाही. कारण दादांनी अभ्यास करूनच हा निर्णय घेतला आहे. अडीच वर्षाच्या काळात अजितदादांनी जो निधी आमदारांना दिला त्यामुळे बहुतांश आमदार अजित पवारांसोबत आहेत. नाशिक जिल्ह्यातील आम्ही ३ आमदार अजित पवारांकडेच गेलो होतो. नरहरी झिरवाळ हेदेखील होते. ५ तारखेच्या बैठकीला अजित पवारांनी जी बैठक बोलावली तिथे आम्ही सर्व जाणार आहोत असं आमदार नितीन पवार यांनी म्हटलं.

Nitin Pawar, Ajit Pawar
अमोल कोल्हेंच्या यु-टर्ननंतर आव्हाडांची प्रतिक्रिया

दरम्यान, शरद पवार हे आमचे नेते आहेत. येणाऱ्या निवडणुकीत कुठलीही अडचण येणार नाही असा शब्द अजित पवारांनी आमदारांना दिल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी सांगितली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com