भगतसिंग कोश्यारी यांना धमकी दिली असेल तर अजित पवार म्हणाले...

भगतसिंग कोश्यारी यांना धमकी दिली असेल तर अजित पवार म्हणाले...

भगतसिंग कोश्यारींनी राज्याच्या राज्यपाल पदावरुन पदमुक्त झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

चंद्रशेखर भांगे , पुणे

भगतसिंग कोश्यारींनी राज्याच्या राज्यपाल पदावरुन पदमुक्त झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, भगतसिंग कोशारी आता राज्यपाल पदावर नाहीत, त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यास मी बांधील नाही. आता आमच्यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. आम्ही निवडणुकीमध्ये लक्ष घातले आहे. आज दिवसभर मी रवींद्र धंगेकरांच्या रॅलीत होतो. त्यामुळे ते काय बोलले ते मी नीट ऐकलं नाही. ते जे काही बोलले ते उद्या ऐकेन आणि त्यानंतर उत्तर देईन असे अजित पवार म्हणाले.

तसेच भगतसिंग कोसारी यांना धमकी दिली असेल तर ते पत्र रेकॉर्डवर असेल, ते पत्र त्यांनी सर्वांसमोर आणावं. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. असे देखिल अजित पवार यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com