Ajit Pawar
Ajit PawarTeam Lokshahi

“मला मूर्ख समजू नका, उमेदवारी अर्जाबद्दल विचारल्यानंतर अजित पवार भडकले

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे.अर्ज भरण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या उमेदवाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना यावरुन प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार चांगलेत भडकले.

अजित पवार म्हणाले की, “मला मूर्ख समजू नका, मी उद्याच उमेदवाराचे नाव सांगेन”“उद्या सकाळी डांगे चौकात जमून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज भरला जाईल. अर्ज भरण्याच्यावेळी मी उपस्थित राहीन”,“आम्ही उद्या अर्ज भरणार आहोत. महाविकास आघाडीचा उमेदवार अर्ज भरेल. ऐनवेळीच उमेदवार घोषित करण्याचा प्रश्न नाही”. असे अजित पवार म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, “पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी मला एकदा विनंती केली. देवेंद्र फडणवीस यांनी एकदा विनंती केली. चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. याबाबत मविआचे तीनही पक्षाचे वरिष्ठ निर्णय देतील त्यानुसार काम होईल” असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com