ताज्या बातम्या
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटलं; अजित पवार म्हणाले...
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नपुंसक म्हटलं; अजित पवार म्हणाले...
महाराष्ट्रात काही सभांमधून हिंदू संघटनांकडून करण्यात येत असलेल्या द्वेषपूर्ण भाषणांवर महाराष्ट्र पोलीस कारवाई करत नसल्याचा मुद्दा उपस्थित करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने उत्तर दिले आहे की, राज्य सरकार नपुंसक आहे, असमर्थ आहे, वेळेत कारवाई करत नाही. असे न्यायालय म्हणाले.
याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, आम्ही अधिवेशनाच्या निमित्ताने ४ आठवडे तेच सांगत होतो की आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे.न्यायालयानं या सरकारला नपुंसक सरकार म्हटलंय. कारभार कशाप्रकारे चालतोय कुणास ठाऊक. आता दोष कुणाला द्यायचं.हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? हा सरकारचा कमीपणा नाही का? असे अजित पवार म्हणाले आहेत.

