बातम्या
कांदा प्रश्नावरुन अजित पवार आक्रमक म्हणाले...
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. कांदा आणि कापूस दरांवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. डोक्यावर कांदे घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. विरोधकांकडून कांदा प्रश्नावर आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज चर्चा घ्यावी. राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावे. सरकारने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा. अशी मागणी अजित पवार यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केली आहे.