ताज्या बातम्या
Ajit Pawar On Parth Pawar Land Case : 'मी माहिती घेतली, 1 रुपयाचाही व्यवहार नाही' अजित पवारांचं वक्तव्य
पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण अजित पवारांनी केलेलं वक्तव्य मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे. यावेळी साताऱ्यात बोलत असताना अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण अजित पवारांनी केलेलं वक्तव्य मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे. यावेळी साताऱ्यात बोलत असताना अजित पवार म्हणाले की, "मी कुणाच्याही पाच पैशाला मिंधा नाही. मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे, आता जे घडायला नको होतं ते घडलं".
"मी माहिती घेतली तर त्यात एक रुपयाचा व्यवहार झाला नाही. एक रुपया कुणाकडून घेतला नाही आणि कुणाला एक रुपया दिला नाही. याप्रकरणी एक कमिटी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घातले आहे."
"तिघांवर यात एफआयआर झाली आहे. जनतेची सेवा करताना कधी आरोप होतात, कधी कौतुक होते, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणावर भाष्य केले."
