पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका; तात्काळ सर्वेक्षण स्थगित करा - अजित पवार

पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका; तात्काळ सर्वेक्षण स्थगित करा - अजित पवार

पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका ;तात्काळ सर्वेक्षण स्थगित करा - अजित पवार
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बारसू रिफायनरीसाठी होणारे सर्वेक्षण तात्काळ स्थगित करून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी व त्यावर मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका, अशी विनंती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्वीट करत सरकारला केली आहे.

रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. त्या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे. खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावले आहे. त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com