गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत अजित पवार यांचा फोटो; राजकीय चर्चांना पुन्हा उधाण
Admin

गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत अजित पवार यांचा फोटो; राजकीय चर्चांना पुन्हा उधाण

अजित पवार भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

अजित पवार भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितले की, मी राष्ट्रवादीतच राहणार. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनामा दिला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राजीनामा मागे घेतला. आता पुन्हा एकदा एका जाहीरातीमुळे चर्चांना उधान आलं आहे.

गिरीश महाजन यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत अजित पवार यांचा फोटोशरद पवार यांचा फोटो छापण्यात आला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच अजितदादांच्या फोटोखाली जिवाभावाचा माणूस असं लिहिण्यात आले आहे.

पवार-मोदींच्या फोटो खाली अजित पवार, फडणवीस आणि महाजन यांचा तिघांचा एकत्रित फोटोही छापण्यता आला आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com