' ...तोपर्यंत मला मुख्यमंत्री होता येणार नाही'; भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरवर अजित पवारांची प्रतिक्रिया

' ...तोपर्यंत मला मुख्यमंत्री होता येणार नाही'; भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरवर अजित पवारांची प्रतिक्रिया

निलेश लंकेंनी राज्याचे विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलं होते.

निलेश लंकेंनी राज्याचे विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचं आवाहन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केलं होते. “आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायचंय. फक्त व्यासपीठावर बोलण्यापेक्षा दादांची काम करण्याची पद्धत घराघरात पोहोचवण्याचं काम येत्या वर्षभरात करायचं आहे. पुढच्या वर्षी आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. त्यामुळे राज्यातला विकासाचा थांबलेला गाडा घराघरांत पोहोचवणं गरजेचं आहे. मी तर बऱ्याच भाषणांत सांगतो, की अजित पवारांना फक्त पाच वर्षं मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर आपलं राज्य २५ वर्षं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आहे. जर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल, तर ते संपूर्ण महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ठरू शकतील. असे निलेश लंकेनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री एकच दादा अजित दादा अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आले आहेत. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की,जर मी तुमचं होर्डिंग लावलं, तरी 145 आमदारांचा पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्या होर्डिंगला काहीही अर्थ नाही. 145 आमदारांच्या पाठिंब्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही.कार्यकर्त्यांनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून बॅनर लावले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी लावलेल्या पोस्टरला जास्त मनावर घेऊ नका. असे अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com