लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा; लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधताना अजित पवार यांनी बहिणींना लवकरच ओवाळणी मिळणार असे सांगितले आहे. जनसन्मान यात्रेतीन महिलांशी संवाद साधताना त्यांनी हे म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले की, तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या मायमाऊलींना ऑक्टोबरचं, नोव्हेंबरचं 3 हजार रुपये तुम्हाला पाठवतो. जसं माझ्या रक्षाबंधनला आम्ही हजार रुपये दिले. महायुती सरकारने दिले.
तसं भाऊबीज आहे. भाऊबीजेलासुद्धा माझ्या बहिणीला, माझ्या माय माऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही. तिला ओवाळीने देणार म्हणजे देणार. असे अमित शाह म्हणाले.
याच्याआधी रक्षाबंधनला महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या दोन महिन्यांचा एकत्रित हफ्ता 3000 रुपये जमा केला होता. तसेच आता देखील ऑक्टोबर,नोव्हेबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यात जमा होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.