ताज्या बातम्या
स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरण; अजित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली.
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून यावरुन आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे.
आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. अजित पवार म्हणाले की, काल पुण्यातील घटनेचा सर्वांनी निषेध केलेला आहे. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. त्या नराधमाला ताबडतोब अटक होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो. आज त्याला अटक झालेली आहे. पोलिसांच्या ताब्यात तो आहे. पूर्णपणे चौकशी चाललेली आहे. असे अजित पवार म्हणाले.