Ajit Pawar : 'बारामतीत आत्तापर्यंत मी जेवढ काम केलं तेवढं कुणी केलं नाही'; पवारांचा टोला कुणाला?
राष्ट्रवादी आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी बारामती येथे झालेल्या कार्यक्रमात दिव्यांगांना मोफत सायकल वाटप केली. यावेळी आपल्या भाषणात अजित पवार यांनी शरद पवारांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. "बारामतीत केलं तेवढं काम करणारा एकही आमदार मिळणार नाही," असं अजित पवार म्हणाले. 'चुका पोटात घालून आता पोट फुटायला लागलं', असा घणाघातही त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "मला काही लोकांचा फोन येतो की, दादा पोटात घ्या पोटात घ्या, अरे काय पोटात घ्या, पोट फुटायला लागलं. ज्यांनी फोन केला त्यांना शरम कशी वाटत नाही, असं सांगायला. बारामतीत विकास कामे करतो आहे. पण काही जणं वेडेवाकडेपणा करतात. बारामतीत मी जेवढा आत्तापर्यंत काम केलं तेवढं काम करणारा एकही आमदार तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही. 1952 पासून आतापर्यंत जे आमदार झाले त्यांनी काय कामे केलं ते पाहा.. आणि मी केलेलं काम पाहा.. अजूनही काम करणार," असं पवारांनी नमूद केलं.