Ajit Pawar Solapur : सोलापुरात शेत नुकसान पाहणीदरम्यान अजित पवारांसमोर अचानक मर्डर केसची गुगली

अजित पवार सोलापुरात नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी गेले असताना, त्यावेळी एक व्यक्ती अजित पवारांजवळ रडत आला आणि त्याने एका खूनप्रकरणाची कहाणी अजित पवारांसमोर मांडली.
Published by :
Prachi Nate

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन सीना नदीच्या पुराचे पाणी शेतांमध्ये आणि घरांमध्ये घुसून मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बुधवारी सकाळपासून करमाळा तालुक्यातील कोर्टी, संगोबा या गावांचा दौरा केला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करण्याासाठी दौरा अजित पवारांनी केला होता.

त्यावेळी एक व्यक्ती अजित पवारांजवळ रडत आला आणि त्याने एका खूनप्रकरणाची कहाणी अजित पवारांसमोर मांडली. यावेळी त्या व्यक्तीने रडत रडत सांगितले की, त्याच्या भावाने एका महिलेसोबत असलेल्या विवाह बाह्य संबंधामुळे स्वत:च्याच गरोदर बायकोची हत्या केली. एवढचं नव्हे तर स्वत: देखील गळफस लावून आत्महत्या केली.

यावर त्या महिलेचा कसून तपास व्हावा आणि तिला शिक्षा करावी अशी मागणी त्या व्यक्तीने अजित पवाारांसमोर केली. अजित पवारांनी तेथील पोलीस उपायुक्तांना याप्रकरणात लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आणि नंतर पुढच्या दौऱ्यासाठी रवाना झाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com