'भावकीची निवडणूक करणाऱ्यांना मी बघून घेतोच' अजित पवारांचा सख्खा भाऊ-वहिणीला इशारा? तर कोल्हेंना आव्हान

'भावकीची निवडणूक करणाऱ्यांना मी बघून घेतोच' अजित पवारांचा सख्खा भाऊ-वहिणीला इशारा? तर कोल्हेंना आव्हान

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. याचसोबत अजित पवारांनी शिवाजीराव आढळराव पाटलांना शिरूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. तसचं ही निवडणूक गावकीची आणि भावकीची नाही, माझ्या बाबतीत भावकीची निवडणूक करणाऱ्यांना मी बघून घेतोच त्याचं काय करायचं असा इशारा त्यांनी दिला आहे.

हा इशारा त्यांनी काका शरद पवार, सख्खे भाऊ श्रीनिवास पवार आणि वहिणी शर्मिला पवार यांना दिला आहे अशा चर्चांणा आता जोर धरु लागलं आहे. तसचं अजित पवारांनी अमोल कोल्हेंना देखील आव्हान दिलं आहे.

'माझ्या बाबतीत भावकीची निवडणूक करणाऱ्यांना मी बघून घेतोच'

खासदारकीला एक, आमदारकीला एक यापुढं असं अजिबात चालणार नाही. दोन्ही ठिकाणी घड्याळ चालवायचं आहे. प्रत्येकानं आपापला गाव बघा. आधी तर भावकी सोबत आहे का हे पण बघा. अरे बाबा मला भावकीच माहितेय असं अजित पवार म्हणाले.

बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. त्याचवेळी पवार कुटुंबीय मात्र सुप्रिया सुळेंच्या मागे खंबीर उभं असल्याचं दिसतंय. कुटुंबात आपल्याला एकटं पाडलं जातंय, तुम्ही साथ द्या अशी भावनिक साद या आधी अजित पवारांनी बारामतीकरांना घातली होती. त्यानंतर अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनीही अजित पवाांच्या विरोधात भूमिका घेत सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू केला.

पवार कुटुंबातून अजित पवारांवर होणाऱ्या टीकेनंतर आता अजित पवारांनी त्याला थेट उत्तर दिलंय. ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही. आता माझ्या बाबतीत काहींनी भावकीची निवडणूक केली आहे, मी त्यांना बघून घेतोच असा थेट इशाराच त्यांनी दिलाय.

अमोल कोल्हेंवर टीका करत म्हणाले की, अमोल कोल्हे तुम्ही नथुराम गोडसेंची भूमिका केली आहे, हे सांगून दाखवा. तुम्ही व्हाय किल्ड गांधी यात नथुराम गोडसेची भूमिका केली होती. तुम्ही महाराजांच्या भूमिका केल्याचं सांगता, एकदा नथुराम गोडसेंची भूमिका केल्याचं सांगा. बघू मग काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतात का’, असं आव्हान अजित पवारांनी अमोल कोल्हेंना दिलं आहे.

पुढे ते म्हणाले की, शिरूर लोकसभा आपल्याला मिळावी म्हणून मी नेहमी प्रयत्न करायचो. 2009 साली विलास लांडे पडले. 2014 साली तर मोदींची लाट होती, त्यावेळी तीन लाखांच्या फरकाने हा गडी निवडून आला. गेली पंधरा वर्षे हा बाबा काय हलेना. मग 2019साली मी अमोल कोल्हेना गाठलं. पण कोल्हे काय तयारच होत नव्हते. आता एखादा राजकीय नेता पडत नसेल तिथं कलाकाराला उभं केलं जातं. अमिताभ बच्चनला काढलं, गोविंदा ला काढलं, शत्रुघ्न सिंहांना काढलं. ( काढलं म्हणजे उभं केलं, न्हायतर गल्लत कराल असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला) या अभिनेत्यांप्रमाणे कोल्हे ना उभं केलं. ते खासदार ही झाले. मात्र या बाबाने मतदारांशी संपर्कच ठेवला नाही. सगळे नेते ही तक्रारी करू लागले. मला पण हे काही पटलं नाही. कोरोना काळात एक दिवस माझ्याकडे आले अन म्हणाले मला काय हे झेपेना. आता मी राजीनामा देतो. समाजाचे हित एखादा नेता जेंव्हा जोपासतो, तेंव्हा आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. आता शिवाजी आढळराव मोठे उद्योजक आहेत, मात्र त्यांनी जनतेसाठी स्वतःला झोकून दिलं आहे. ह्या दोघांची तुलना केली तर लक्षात येतं, आढळराव हे सरस आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com