Baramati : बारामतीच्या नगराध्यक्ष पदासाठी अजित पवारांच्या चिरंजीवांच्या नावाची वर्णी? राजकीय वर्तुळात चर्चा
आगामी निवडणुकीपूर्वी बारामतीत नवीन चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. अशातच बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांच्या नावाची राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा होत आहे.
बारामती नगर परिषद नगराध्यक्ष पदाची जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार,पार्थ पवार यांचे मतदान काटेवाडीत,जय पवार यांचे मतदान बारामतीत असल्याने चर्चांना बळ मिळतं आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत देखील जय पवार प्रचारात सक्रिय असल्याची माहिती आहे.
मात्र अजून देखील कोणतीही निवडणूक न लढविल्याने जय पवार यांची बारामती नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीद्वारे राजकारणातील एन्ट्री होऊ शकते. भविष्यात राजकीय कारकिर्दीला बळ मिळण्यासाठी जय पवार बारामती नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढू शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

