Cooper Government Hospital : कुपर रुग्णालयात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सर्व डॉक्टरांनी पुकारले आंदोलन

Cooper Government Hospital : कुपर रुग्णालयात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सर्व डॉक्टरांनी पुकारले आंदोलन

मुंबईतील (Mumbai) कूपर शासकीय रुग्णालयामध्ये (Cooper Government Hospital) आपत्कालीन विभागातील डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ‘डॉक्टर प्रामाणिकपणे काम करत असताना त्यांना मारहाण होणं
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबईतील (Mumbai) कूपर शासकीय रुग्णालयामध्ये (Cooper Government Hospital) आपत्कालीन विभागातील डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ‘डॉक्टर प्रामाणिकपणे काम करत असताना त्यांना मारहाण होणं आणि प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष करणं हे दुर्दैवी आहे’, असं मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. या पार्श्ववभूमीवर कुपर रुग्णालयात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सर्व डॉक्टरांनी आंदोलन पुकारले आहे. इमर्जन्सी सेवा वगळता अन्य ठिकाणी कूपर रुग्णालयात डॉक्टरांचे काम बंद आंदोलन आहे. रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरला मारहाण केली होती. त्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून जोवर डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये राज्य दलाची सुरक्षा मिळत नाही, तसेच ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई होत नाही तोवर संप सुरू असणार आहे. सोमवार पर्यंत तोडगा निघाला नाही तर पूर्ण सेवा ठप्प करत डॉक्टर संपावर जाणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com