शिक्षक व पदवीधरचे सर्वच पाचही उमेदवार भाजप व शिंदे गटाचे विजयी होतील - नवनीत राणा यांचा दावा

शिक्षक व पदवीधरचे सर्वच पाचही उमेदवार भाजप व शिंदे गटाचे विजयी होतील - नवनीत राणा यांचा दावा

राज्यात येत्या 30 जानेवारी रोजी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागेसाठी निवडणूक होत आहे,

सुरज दहाट,अमरावती

राज्यात येत्या 30 जानेवारी रोजी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागेसाठी निवडणूक होत आहे, यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीला टोला लगावत राज्यातील सर्व पाचही जागा भाजप व शिंदे गटाच्या विजयी होतील असा दावा त्यांनी केला.

महाविकास आघाडीकडे व्हिजन नाही, तर मकर संक्रांतीचे तिळगुळ देवेंद्र फडवणीस व एकनाथ शिंदे यांच्या तोंडात पडतील कारण केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे त्यामुळे या निवडणुकीत नक्कीच शिंदे व भाजपला यश मिळेल अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com