मविआला धक्का! ऑल इंडिया पँथर सेना 'परिवर्तन महाशक्ती'त
परिवर्तन महाशक्तीमध्ये आणखी एक पक्ष सहभागी झाला आहे. आज छत्रपती संभाजीराजे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ही घोषणा करण्यात आली. मविआतून बाहेर पडत ऑल इंडिया पँथर सेना 'परिवर्तन महाशक्ती'त सोबत युती केली आहे. संभाजीराजेंच्या उपस्थितीत दीपक केदारांनी पाठिंबा दिला आहे.
यावेळी दीपक केदार म्हणाले, सविधान वाचवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत गेलो होतो. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाबरोबर आम्ही युती केली होती. बीड आणि मराठवाड्यात लोकसभेत त्यांचे उमेदवार निवडुण आले. अनेक सभा मी त्यांच्यासाठी घेतल्या. त्यामुळे मविआला मोठं यश मिळालं. महाराष्ट्रातला जो आंबेडकरी समूहाचा टक्का होता तो 50टक्के वळवण्याच काम ऑल इंडिया पँथर सेनेन केलं. पण दुदैवाने दोन जागेचा प्रस्ताव त्यांना स्वत मांगितला होता आणि त्यातली एक जागा सुद्धा आंबेडकरी चळवळीच्या नव्या चेहऱ्यासाठी सोडण्याची मविआने कोणतीही तस्ती दाखवली नाही. दुदैवाने मी ऊसतोड मजुराचा मुलगा आहे. माझे नातेवाईक कुणी मंत्री, आमदार, खासदार नाहीत म्हणून त्यांना मला नाकारला असावा अशी शक्यता मला वाटते.