सगळे प्रकल्प फक्त गुजरातला जातायत,हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही - रोहित आर आर पाटील

सगळे प्रकल्प फक्त गुजरातला जातायत,हे महाराष्ट्रासाठी योग्य नाही - रोहित आर आर पाटील

सगळे प्रकल्प महाराष्ट्रातून एकाच राज्यात का नेले जात आहेत ? इतर राज्य असताना फक्त गुजरातलाच प्रकल्प का नेले जात आहेत ? हा प्रश्न आहे,

संजय देसाई, सांगली

सगळे प्रकल्प महाराष्ट्रातून एकाच राज्यात का नेले जात आहेत ? इतर राज्य असताना फक्त गुजरातलाच प्रकल्प का नेले जात आहेत ? हा प्रश्न आहे,अश्या शब्दात राष्ट्रवादीची युवा नेते रोहित आर आर पाटलांनी टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला गेल्या प्रकरणी हल्लाबोल केला आहे,ते सांगलीच्या अंजनी मध्ये बोलत होते.तसेच देशात महाराष्ट्र सगळ्यात अग्रेसर आहे.

महाराष्ट्रातले प्रकल्प एकामागून एक गुजरात मध्ये जात आहेत, देशात अनेक राज्य असताना फक्त गुजरात मध्येच हे प्रकल्प का जातायेत,असा प्रश्न उपस्थित करत,हे महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नसून तरुणांनी याचा विचार केला पाहिजे,असे मत देखील रोहित आर आर पाटलांनी यावेळी व्यक्त केला आहे.

त्याचबरोबर नोटावरील फोटो बदलण्याच्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागणीनंतर सुरू झालेल्या वादावरून बोलताना,रोहित पाटलांनी म्हणाले,अनेक नेते आज नोटा बदलण्याची मागणी करतात मात्र नोटा बदलून देशाची अर्थव्यवस्था बदलेलं,अशी परिस्थिती नाही आणि नोटा पुन्हा छापने हे देशाच्या हिताचे देखील नसून चेहरा चांगला नसेल तर आरसा बदलून काही होत नाही,त्याला चेहरा चांगला करावा लागेल,असा टोल नोटा वरील फोटो बदलण्याच्या मागणी करणाऱ्या नेत्यांना रोहित पाटलांनी लगावला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com