जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेले सर्व शासन निर्णय रद्द, आता सर्व अधिकार ‘म्हाडा’ला

जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेले सर्व शासन निर्णय रद्द, आता सर्व अधिकार ‘म्हाडा’ला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के देत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के देत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहनिर्माण मंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जबाबदारी होती. मविआच्या काळात आव्हाड यांनी अनेक निर्णय घेताना म्हाडा बाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यांनी म्हाडाचे सगळे अधिकार काढून घेत ते सरकारकडे ठेवले होते. त्यामुळे म्हाडाचं काम हे फक्त प्रस्ताव तयार करणं आणि ते सरकार दरबारी पाठवणं इतकीच मर्यादित राहिली होती.

गृहनिर्माण विभागाचा कार्यभार हा सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. याआधीच म्हाडाला पूर्वीप्रमाणे अधिकार बहाल करणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं. तसे आदेशही गृहनिर्माण विभागास देण्यात आलेले होते. त्याप्रमाणे गुरुवारी प्रत्येक निर्णय रद्द करण्यात आला आहे

जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेले सर्व शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत. आता गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे अधिकार पुन्हा एकदा म्हाडा आणि विभागीय मंडळांना देण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहनिर्माण मंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जबाबदारी होती. मविआच्या काळात आव्हाड यांनी अनेक निर्णय घेताना म्हाडा बाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला होता.

जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेले सर्व शासन निर्णय रद्द, आता सर्व अधिकार ‘म्हाडा’ला
विरोधकांची दहा तोंडे, हेच भाजपचं बलस्थान; शिवसेनेच्या सामनातून विरोधकांना एकत्र येण्यासाठी हाक
Lokshahi
www.lokshahi.com