Mahakumbh 2025: चेंगराचेंगरीनंतर महाकुंभ परिसरात सर्व वाहनांवर बंदी, व्हीव्हीआयपी पास रद्द
थोडक्यात
महाकुंभ परिसरात सर्व वाहनांवर बंदी
महाकुंभासाठीचे व्हीव्हीआयपी पास रद्द
चेंगराचेंगरीनंतर यूपी सरकारची मार्गदर्शक तत्त्वे
महाकुंभमेळ्यात दररोज लाखो भाविक स्नान करण्यासाठी येतात. मात्र, मौनी अमावस्येच्या पवित्र दिनी गंगा घाटावर स्नान करण्यासाठी भाविकांचा प्रचंड मोठा जनसमुदाय उसळला होता. यावेळी ३० भाविकांचा महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. या परिसरातील बॅरिकेट्स हटल्याने भाविक एकमेकांवर पडले. आणि एकच गोंधळ उडाला. चेंगराचेंगरीत ९० हून अधिक भाविक जखमीही झाले आहेत.
भविष्यामध्ये ही परिस्थिती टाळण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यामुळे आता इथे येणाऱ्या भाविकांना या नियमांचे पालन करावं लागणार आहे. या भागात सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच व्हीव्हीआयपी पास रद्द करण्यात आले आहेत.
महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे
महाकुंभ परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी
गर्दीचे योग्य व्यवस्थापन आणि भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली आहे.
व्हीव्हीआयपी पास रद्द, कोणत्याही विशेष पासद्वारे वाहनांना प्रवेश मिळणार नाही.
प्रयागराज लगतच्या जिल्ह्यांमधून येणारी वाहने जिल्ह्याच्या सीमेवर थांबवली जाणार.
चारचाकी वाहनांना ४ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशबंदी
परिसरात वाहतूक सुरळीत राहावी आणि अनावश्यक थांबे टाळण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना जर वाहतुकीवर परिणाम होत असेल तर रिकाम्या भागात हलवण्याच्या सूचना
प्रयागराजहून परतीचे सर्व मार्ग खुले आणि विनाअडथळा ठेवण्याच्या सूचना
भाविकांना परिस्थिती लक्षात घेऊनच पुढे जाण्याची परवानगी द्यावी.
मेळा परिसरात जेथे थांबतील, तिथे अन्न आणि पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात यावी.
फतेहपूर-प्रयागराज, अयोध्या-प्रयागराज, लखनौ-प्रतापगढ-प्रयागराज, कानपूर-प्रयागराज आणि वाराणसी-प्रयागराज यामार्गांवर वाहतूक ठप्प होणार नाही याची काळजी घेण्याचे पोलिसांना आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. येत्या दोन दिवसांत लाखो भाविक वाराणसी, चित्रकूट, अयोध्या, मिर्झापूर येथे येत असल्याचं आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. परिस्थितीवर लक्ष ठेऊन दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. गर्दी प्रवाही ठेवण्यासाठी आणि मेळा परिसरात योग्य पार्किंग व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी बॅरिकेडिंगचा प्रभावीपणे वापर करावा असे निर्देश ही यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.