Palghar Rain
Palghar RainTeam Lokshahi

मुंबईसह, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पावसाचा जोर वाढणार

मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आजही हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आजही हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कमी दाबाचं क्षेत्र गुजरातकडून महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत असल्यानं जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात म्हणजे नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

सकाळपासूनच मुंबईसह ठाणे परिसारत पावासाचा जोर वाढला आहे. रात्रभर पावसाची रिपरिप सुरु होती. त्यानंतर सकाळपासून पावसाचा जर वाढला आहे. आता पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 16 आणि 17 सप्टेंबर म्हणजे आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com