मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवेंनी सरकारला धरलं धारेवर, म्हणाले, 'मुंबईला कोणी वाली राहिलेला नाही'

मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवेंनी सरकारला धरलं धारेवर, म्हणाले, 'मुंबईला कोणी वाली राहिलेला नाही'

मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.
Published by :
shweta walge

मुंबई महानगरात काल मध्यरात्रीनंतर १ वाजेपासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी ३०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही सखाल भागांमध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले आणि उपनगरीय रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संतापले आहेत. यावरुन त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरल आहे.

ते म्हणाले की, मुंबईत पाऊस येणं हे अचानक नाही. यातून पावसाळ्यापूर्वी काम झालेलं नाही हे सिद्ध होत. आदित्य ठाकरे जोपर्यंत होते, तोपर्यंत मुंबईत बारकाईने लक्ष देत होते. मात्र आता मुंबईला कोणी वाली राहिलेला नाही, अशी टीका त्यांनी यावेळी सरकारवर केली आहे.

पुढे म्हणाले, वरळीत शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलाने आपल्या भरधाव महागड्या बीएमडब्ल्यू कारने हिलेला चिरडले आणि तिथून फरार झाला. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याला ताब्यात घेतले आहे. मात्र उपनेत्याचा मुलगा अद्याप फरार आहे. यावरून अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा मुलगा हा मद्यपान करून महिलेला घडक देतो, फरफटत नेतो. सर्वसामान्य माणसाचा जीव कसा घेता येतो,याचं हे उत्तम उदाहरण आहे. मुख्यमंत्री भल्याभल्यांची विकेट घेतात, मात्र एवढी यंत्रणा असून आरोपीला पकडू शकले नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com