Ambadas Danve : मी मागच्या 10 वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे

Ambadas Danve : मी मागच्या 10 वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे

अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar

अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये अंबादास दानवे म्हणाले की, मी ठाकरे गटातच राहणार. मी नाराज असल्याच्या चर्चांना अर्थ नाही. मी मागच्या 10 वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे. माझी इच्छा कधीच लपून राहिलेली नाही. अजूनही साहेबांनी नवा चेहरा दिला नाही आहे.

उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे, आग्रह नाही. भूमिका नेतृत्वापर्यंत पोहचली पाहिजे. चंद्रकांत खैरे नेहमीच मला डावलण्याचा प्रयत्न करतात. मी खैरेंसाठी काम करत नाही, मी ठाकरेंसाठी काम करतो. पक्षात वाद नाही, पण स्पर्धा असायला हवी. ते असे आरोप करत असतात. त्यांच्या आरोपात काही तथ्य नसतं. त्यांचा स्वभाव तसा आहे.

पक्षाच्याविषयी माझ्या मनात संभ्रम निर्माण होऊच शकत नाही. मी उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे. पक्ष प्रमुख्यांच्या कानावर काही बाबी जायला हवी. उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील. मी पक्षाचा बांधील शिवसैनिक आहे. असे अंबादास दानवे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com