चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाकरे गटाची लोकसभेच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, दिल्ली गाठण्यासाठी ही यादी प्रभावी यादी आहे. या यादीतले जास्तीत जास्त शिवसैनिक उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत पोहचतील. जे 400 पार बोलतात त्यांना तडीपार केल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत. मी इच्छुक होतो. माझी इच्छा आहे. मी संघटनेचं काम करतो. मागच्या 25- 30 वर्षापासून. इच्छा असणं वावगं असण्याचे कारण नाही. इच्छा असणं शिवसैनिकाचा अधिकार आहे. आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे.

मी आता फक्त संभाजीनगरपुरता थोडी मर्यादीत राहिलो आहे मी महाराष्ट्राचे काम करतो माननीय उद्धवजींच्या आशीर्वादाने. त्यामुळे निश्चित संभाजीनगरसहित महाराष्ट्रातील सगळं उमेदवार निवडून आणण्यासाठी जिवाचं रान करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे एवढं निश्चित. मला पक्षाचं हित कळते, मला संघटनेचं हित कळते. कधी व्यक्तीगत हितापेक्षा संघटनेचं हित महत्वाचे असतं. माझ्यावर जी जबाबदारी आहे की योग्यरितीने पार पाडणं ही माझी आताच्या काळात गरज आहे. मी पक्षप्रमुखांना फोन केला होता. त्यांना मी सांगितले की चिंता नसावी. जोमाने पक्षाचे काम करु. इच्छा असल्यावर नाही झाल्यावर थोडेफार वाटतं असतं. पण अजून तर खूप बाकी आहे. या जिल्ह्याचे नेतृत्व पक्षप्रमुख यांनी माझ्याकडे सोपवले आहे. येणाऱ्या काळात जबाबदारी मिळत राहतील. असे अंबादास दानवे म्हणाले.

दानवे पुढे म्हणाले की, सत्ता आणि संपत्तीचा अतिरेकी वापर भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रात या देशात करते आहे. केजरीवारसाख्या एका मुख्यमंत्र्यांना त्यांनी अटक केलेली आहे. सत्तेचा गैरवापरच झाला ना. तुम्ही फार धुतलेला आहेत काय? तुमच्या खात्यात हजार कोटींचे रोखे आले आहेत. हे ब्लॅकमेल करूनच आलेले आहे. हे आव्हान आहे. हे आव्हान देखील आम्ही सहज पेलू. जगाचा इतिहास बघितला तर सत्तेच्या पुढे सर्व सामान्य लोक जिंकलेले आहेत.

तसेच शिंदे गटाकडून दर चार पाच दिवसांनी फोन येतात. हे स्पष्ट आहे मी काही त्याला नाकारत नाही. मात्र माझ्याकडून होकार नाही. सर्व माझे जुने सहकारी. त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यांना वाटतं मी सोबत असावे. मात्र मी उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत आहे. मीच गद्दारी विषयी भाषण करणार आणि मीच गद्दारी करणार हे काय मनाला पटणार नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com