Ambadas Danve : पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणी दोन-तीन दिवसांत पुरावे देणार,लोकशाही'शी बोलताना अंबादास दानवेंचा खुलासा...

Ambadas Danve : पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणी दोन-तीन दिवसांत पुरावे देणार,लोकशाही'शी बोलताना अंबादास दानवेंचा खुलासा...

पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात 'दोन-तीन दिवसांत देणार पुरावे' देणार 'लोकशाही'शी बोलताना अंबादास दानवेंनी खुलासा केला आहे. न्यूज प्लॅनेट या विशेष कार्यक्रमात दानवे होत होते.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात 'दोन-तीन दिवसांत देणार पुरावे' देणार 'लोकशाही'शी बोलताना अंबादास दानवेंनी खुलासा केला आहे. न्यूज प्लॅनेट या विशेष कार्यक्रमात दानवे होत होते. पुण्यातील कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. पार्थ पवार यांनी 'मी कोणताही घोटाळा किंवा चुकीचं काम केलेलं नाही,' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना (UBT) नेते अंबादास दानवे यांनी आरोप केला आहे की, पार्थ पवार यांच्या Amedia Holdings LLP कंपनीने १,८०० कोटी रुपयांची सरकारी जमीन फक्त ३०० कोटी रुपयांना विकत घेतली. या मोठ्या व्यवहारासाठी फक्त ५०० रुपये मुद्रांक शुल्क (Stamp Duty) भरण्यात आले, तर सुमारे २१ कोटी रुपयांची सूट देण्यात आली, असाही आरोप आहे. ही ४० एकर जमीन मूळतः महार वतन जमीन म्हणून वर्गीकृत आहे, जी हस्तांतरणीय नसते. या आरोपांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत आणि एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. या प्रकरणी पुणे तहसीलदारांना निलंबित करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com