Parbhani Protest
Parbhani Protest

संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी आंबेडकरी अनुयायी आक्रमक, आज परभणी बंदची हाक

संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले आहेत. आज परभणी बंदची हाक देण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले असून, त्यांनी परभणी बंदची हाक दिली आहे. संविधानाच्या अपमानामुळे आंबेडकरी अनुयायी आंदोलित झाले आहेत. अनुयायी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. संविधानाच्या अवमाना विरोधात आंदोलकांनी परभणीत तीव्र आंदोलन सुरू केले आहे. ज्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

थोडक्यात

  • संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी आंबेडकरी अनुयायी आक्रमक

  • आंबेडकरी अनुयायांकडून आज परभणी बंदची हाक

  • संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी आंदोलन

काय घडलं?

परभणीत एका माथेफिरूने संविधान पुस्तकाचा अपमान केल्याने आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले आणि तीव्र विरोध प्रदर्शन सुरू केले. शेकडो आंबेडकरी अनुयायी रेल्वे रुळावर जमा झाले आणि त्यानंतर आंदोलकांनी नंदिग्राम एक्सप्रेस रोखली. या आंदोलनाद्वारे ते संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करत होते. माथेफिरूवर कारवाई होईपर्यंत आंदोलकांनी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला, ज्यामुळे स्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com