पोलादपूर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट उद्या बंद

पोलादपूर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट उद्या बंद

पोलादपूर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट उद्या बंद राहणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पोलादपूर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट उद्या बंद राहणार आहे. रस्त्याच्या कामासाठी इथली वाहतूक बुधवारी (4 जानेवारी) सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान बंद राहिल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

अतिवृष्टीमुळे याठिकाणचा रस्ता अतिशय खराब झाला होता. त्यामुळे इथे सध्या दुरुस्तीची कामं सुरु आहेत. याआधी 20 जून रोजी पोलादपूर-महाबळेश्वर या रस्त्यावरील किल्ले प्रतापगड फाटा ते मेटतळे या दरम्यानचा घाटरस्ता आणि कुंभरोशी इथून पारफाटा ते देवळी हा रस्ता असे दोन रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवले होते. महाबळेश्वरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळेरस्ता वाहून जाणे, पुल वाहून जाणे अशाप्रकारचंही मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे आज दिवसभरात काम होणार आहे.

पार फाटा ते मेटतळे घाट दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु करण्यात आलं आहे. त्यामुळे आंबेनळी घाटातील रस्ता बुधवारी एक दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या कामामुळे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. यामुळे कोकणातून महाबळेश्वरला येणाऱ्या आणि जाणाऱ्या पर्यटकांची मात्र मोठी अडचण होणार आहे. असे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com