Kim Kardashian: अमेरिकन अभिनेत्री किम कार्दशियन पडली 'ऑटोरिक्षाच्या प्रेमात'

Kim Kardashian: अमेरिकन अभिनेत्री किम कार्दशियन पडली 'ऑटोरिक्षाच्या प्रेमात'

हॉलिवूड गायिका किम कार्दशियन अनंत- राधिकाच्या लग्नासाठी भारतात आली असून आता तिला दक्षिण मुंबईमध्ये हटके फोटोशूट करायचं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राधिका मर्चेंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्नाची सध्या चर्चा सुरु आहे. या लग्नाला या लग्नासाठी बॉलिवूडसह हॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, बिझनेसमन आणि राज्यातील काही महत्वाचे राजकीय मंडळीही यावेळी उपस्थित राहणार आहेआता मुंबईतील बांद्रा कुर्ला सेंटर येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणाऱ्या या लग्नाला उपस्थित राहणाऱ्या परदेशी पाहुण्यांची यादी समोर आली आहे.

हॉलिवूड गायिका किम कार्दशियन अनंत- राधिकाच्या लग्नासाठी भारतात आली असून आता तिला दक्षिण मुंबईमध्ये हटके फोटोशूट करायचं आहे. ताज परिसरातील फोटोशूटसाठी तिला ऑटोरिक्षा हवी आहे. मात्र दक्षिण मुंबईत ऑटोरिक्षा चालविण्यास परवानगी नसल्याने फोटोशूट अडचणीत आले आहे. येत्या 13 जुलै रोजी किमचे फोटोशूट होण्याची शक्यता आहे. मात्र आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा अर्ज आलेला नाही, असं वाहतूक सहआयुक्तांनी सांगितलंय. किम कार्दशियन सध्या या फोटोशूटवरून चांगलीच चर्चेत आली आहे.

किम कार्दशियन ऑटोरिक्षाच्या प्रेमात पडली आहे. हे फोटोशूट लालबागच्या मसाला मार्केटमध्ये, सिद्धिविनायक मंदिराजवळ आणि ताज हॉटेलच्या परिसरामध्ये तिला हे फोटोशूट करायचे आहे. किम कार्दशियन ऑटोरिक्षात फोटोशूट करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र तिला आता इथे फोटोशूट साठी परमिशन मिळणार का यावरून चर्चा रंगली आहे रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com