Pune Bhausaheb Rangari Ganpati : ढोल-ताशांचा गजरात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती: ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पा विराजमान, भक्तांचा उत्साह ओसंडून वाहतोय.
Published by :
Riddhi Vanne

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट’चे बाप्पा मोठ्या जल्लोषात विराजमान झाले आहेत. मोठ्या भक्तीमय वातावरणात 'रत्नमहाला'त बाप्पाचं आगमन झालंय. प्रेरणादायी आणि अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते दुपारी दीडच्या सुमारास मंत्रोच्चारात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्याआधी ढोल-ताशा पथकांच्या गजरात मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली होती, यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते.दरवर्षीच्या प्रथा परंपरेप्रमाणे सकाळी सव्वा आठच्या सुमारास ट्रस्टचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त असलेल्या पुनीत बालन तसंच जान्हवी धारीवाल-बालन या दाम्पत्याच्या हस्ते रंगारी भवनात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विधीवत पूजाअर्चा करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com