ममता सरकार कधी कोसळणार? भाजपा मिशन लोटस राबवणार कधी? अमित शाह यांनी तर तारखेसहीत सर्वच सांगितले...

ममता सरकार कधी कोसळणार? भाजपा मिशन लोटस राबवणार कधी? अमित शाह यांनी तर तारखेसहीत सर्वच सांगितले...

बीरभूम जिल्ह्यातील एका सभेला अमित शाह उपस्थित होते.

बीरभूम जिल्ह्यातील एका सभेला अमित शाह उपस्थित होते. यावेळी त्यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये 18 जागा जिंकल्या होत्या.2025नंतर राज्यात ममता बॅनर्जी सरकार राहणार नाही. असे अमित शाह म्हणाले.

यासोबतच त्यांनी सांगितले की, पश्चिम बंगालचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होईल, ममता बॅनर्जी बंगालच्या जनतेच्या हिताचे काम करत नाहीत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही भाजपला 35 जागा द्या. राज्यात आमचं सरकार बनवा. पश्चिम बंगालमधून भाजपाला 35 जागा मिळतील. असे अमित शाह म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com