Amit Shah : अमित शाह पुणे दौऱ्यावर; वाहतुकीत मोठे बदल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात घेणार महत्वाची बैठक घेणार आहेत. हडपसर येथील विठ्ठल तुपे सभागृहात दुपारी तीन वाजता जनता सहकारी बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या समारोपाला देखील सहकारमंत्री म्हणून अमित शाह उपस्थित राहणार आहेत. गृहमंत्र्यांच्या या पुणे दौऱ्याच्या निमित्ताने पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती पुणे वाहतूक पोलीस शाखेकडून देण्यात आली आहे.
विद्यापीठ चौकाकडून बाणेर रोडने राधा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गणराज चौकामधून डावीकडे वळून किया शोरूम अंडरपास किंवा ननावरे अंडरपास मार्गे वळवण्यात आला आहे.
पुणे शहरातून हिंजवडी, वाकड, लोणावळा, मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुणे विद्यापीठ चौकातून पाषाण रोडवरून चांदणी चौकमार्गे जावे
मुंबई-बंगळुरू बायपासवरून बाणेर रोडवर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी बालेवाडी जकात नाका येथून डावीकडे वळण घेऊन हायस्ट्रिट मार्गे गणराज चौकातून रवाना व्हावे.
यासोबतच पुणे विद्यापीठ चौक ते राधा चौक- बाणेर रोड, पुणे विद्यापीठ चौक ते राजीव गांधी पूल - औंध रोड, पुणे विद्यापीठ चौक ते चांदणी चौक- पाषाण रोड, या रस्त्यावर जड, अवजड वाहनांना शनिवारी मध्यरात्री 12 ते रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत प्रवेश बंद राहणार आहे.