ताज्या बातम्या
Amit Shah On Sharad Pawar: 'साखर कारखान्यांसाठी आणि सहकार क्षेत्रासाठी काय केलं?'- अमित शाह
अमित शाहांनी मालेगावात शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. 'साखर कारखान्यांसाठी आणि सहकार क्षेत्रासाठी काय केलं?' असा प्रश्न विचारत त्यांनी पवारांवर निशाणा साधला.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह मालेगावात बोलत असताना, त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, शरद पवार तुम्ही दहा वर्ष देशाचे कृषीमंत्री होतात...
तुम्ही महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांसाठी आणि सहकार क्षेत्रासाठी काय केलं? असा प्रश्न विचारात त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. पुढे ते म्हणाले की, फक्त मार्केटींग बंद करुन नेता होण पुरेसे नाही, त्यासाठी जमिनीवर काम कराव लागतं... असं म्हणतं अमित शाहांनी शरद पवारांवर टोलेबाजी केली आहे.