ताज्या बातम्या
अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर; आज मुंबईत भाजपा नेत्यांसोबत बैठक
अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यासाठी भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना उद्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अमित शाह आज सायंकाळी मुंबईत येणार आहेत. भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत अमित शहांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या तयारीची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली.