Amit Shah
Amit Shah

"राहुल गांधी तुम्ही पाकिस्तानला घाबरा पण आम्ही भाजपवाले आहोत", पालघरमध्ये अमित शहांचा इंडिया आघाडीवर घणाघात

पाकव्याप्त काश्मीर भारताचा होता आणि यापुढेही राहील, असं आश्वासन गृहमंत्री अमित शहा यांनी जनतेला दिलं. ते पालघरच्या महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.
Published by :

Amit Shah On Rahul Gandhi : पाकिस्तानमधून दहशतावादी यायचे आणि देशात बॉम्बस्फोट करायचे. मुंबईलाही दहशतवाद्यांनी हादरंवून टाकलं. काँग्रेसचं सरकार काहीच करत नव्हतं. वोट बँक जाण्याची भीती त्यांना वाटत होती. उरी आणि पुलवामात दहशतवाद्यांनी हल्ला केला. पण त्यानंतर दहा दिवसांतच मोदींनी पाकिस्तानच्या घरात घुसून सर्जिकल स्ट्राईक आणि एयर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. पाकव्याप्त काश्मीर आपला आहे. पण फारुक अब्दुल्ला म्हणतात. पाकव्याप्त काश्मीरबद्दल बोलू नका. त्यांच्याकडे अॅटम बॉम्ब आहे. राहुल गांधी तुम्ही पाकिस्तानला घाबरा पण आम्ही भाजपवाले आहोत. नरेंद्र मोदी देशाचे नेते आहेत. पाकव्याप्त काश्मीर भारताचा होता आणि यापुढेही राहील, असं आश्वासन गृहमंत्री अमित शहा यांनी जनतेला दिलं. ते पालघरच्या महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते.

अमित शहा पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे आणि शरद पवार वेगवेगळ्या गोष्टी सांगून निवडणुकीची दिशाभूल करतात. मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी ही निवडणूक आहे. देशातील विकासाला तिप्पटीने वाढवण्यासाठी ही निवडणूक आहे. भारताला तिसऱ्या क्रमांकावरील अर्थव्यवस्था बनवण्यासाठी ही निवडणूक आहे. गरिब महिलांना तीन कोटी लखपतीदीदी बनवण्यासाठी ही निवडणूक आहे. दिवसभर मोदींवर टीका करण्याचं काम इंडिया आघाडी करत आहे. पण अशा पद्धतीने देश चालत नाही. तुमचा नेता कोण आहे, असं मी इंडिया आघाडीला सातत्याने विचारत आहे. देशाचा प्रधानमंत्री कोण बनेल, असं विचारल्यावर इंडिया आघाडीकडे उत्तर नसतं.

उद्धव ठाकरे पंतप्रधान बनू शकतात का? शरद पवार बनू शकतात का? ममता बॅनर्जी, स्टॅलिन, राहुल गांधी पंतप्रधान बनू शकतात का? तुमचा प्रधानमंत्री कोण, असं त्यांना विचारल्यावर ते म्हणतात, आम्ही टप्प्याटप्प्याने प्रधानमंत्री बदलणार आहोत. देशाचा प्रधानमंत्री देशाचं नेतृत्व करतो. जगात देशाचं प्रतिनिधित्व करतात. पंतप्रधान सतत बदलण्याचा तुमचा फॉर्म्युला काम करणार नाही. कोरोना आल्यावर तुम्ही त्याला सामोर जावू शकत नाही. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देऊ शकत नाही.

दहशतवादाला संपवू शकतात का? नक्षलवादाला समाप्त करू शकतात का? नरेंद्र मोदीच हे सर्व करु शकतात. मोदीच गरिबांचं कल्याण करु शकतात. याआधी सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांनी सरकार चाववलं. त्यावेळी अशीच इंडिया आघाडीची खिचडी होती. त्यांनी १२ लाख कोटींचा भ्रष्टाचार केला. दुसरीकडे नरेंद्र मोदी आहे. जे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री असून २३ वर्षात त्यांच्यावर विरोधकांनी एका रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला नाही, असंही अमित शहा म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com